fbpx

न्यायालयाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला पाहिजे असं मला तज्ज्ञ वकिलांनी सांगितले – अजित पवार


पुणे: एकनाथ शिंदे व शिवसेनेमध्ये व पक्ष चिन्हावर व शिवसेना आमचीच आहे यावरून वाद सुरू आहे. त्यावर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विषयी उद्या सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीत पक्षांतर बंदी कायदा जर तंतोतंत लागू केला तर, उद्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला पाहिजे. असं मला सर्व तज्ञ वकिलांनी सांगितले आहे. असे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने डीपीडीसी विषय जे निर्णय घेतले होते, ते सर्व निर्णय आताच्या सरकारने रद्द केल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू असे देखील अजित पवार म्हणाले.
त्याचबरोबर मेट्रो प्रोजेक्ट हा कांजूरमार्ग मध्येच व्हायला हवा, आरे मध्ये मेट्रो प्रोजेक्ट करायला गेल्यास त्याला अजून उशीर होईल, आधीच मेट्रोचा प्रोजेक्टची किंमत ही दहा हजार कोटी ने वाढली आहे. त्यामुळे मेट्रो कार्डशिट पुन्हा आरे मध्ये करायचा झाल्यास त्याची किंमत आणखी पंधरा हजार कोटी नि वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फटका देखील भविष्यात मेट्रो मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाना बसेल. म्हणून विकास काम कोणत्याही सत्तेची असो त्या विकास कामांना फक्त विरोधाला – विरोध करायला नको असं देखील अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवाव्यात का असे विचारले असता अजित पवार म्हणाले, मी उद्या मुंबईला जाणार असून.तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांशी बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवायच्या की स्वतंत्रपणे लढवायच्या यावर निर्णय होणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: