fbpx
Thursday, September 28, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यातील पाणीकपात 26 जुलैपर्यंत रद्द महापालिकेचा निर्णय

पुणे : पुणे शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला आहे.आषाढी वारी आणि बकरी ईद या सणांमुळे आठ जुलै ते अकरा जुलै या कालावधीत शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला होता.
गेल्या दोन दिवसापासून पुण्याच्या धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस शहाराला नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.
चारही धरणामधील पाणीसाठा विचारात घेता ११ जुलै पासून दिनांक २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शहरात ४ जुलै पासून गुरुवारपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु नियोजनानुसार ज्या दिवशी पाणीपुरवठा होणार होता त्या भागातही उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला.
तर पाणी थोड्याच वेळ आल्याने शेकडो सदनिका असलेल्या सोसायट्यांना टँकरचा आधार घ्यावा लागला. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहरावरील पाणी कपात पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: