fbpx

खडकवासला धरण साखळी मध्ये पुणेकरांना सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा

पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
या धरणात सध्या 32.52 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हे धरण एकूण क्षमतेच्या 58.16 टक्के भरले आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 165 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 13.47 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 12.83 टक्के भरले आहे. वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 89.03 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 24.52 टक्के भरले आहे. तर पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 84.29 दशलक्ष घनमीटर पाणीसा ठा असून धरण 27.95 टक्के भरले आहे.
पावसाचा जोर आणखी चार दिवस कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: