fbpx
Monday, September 25, 2023
BusinessLatest News

सोनालिका ट्रॅक्टर्सने  पहिल्या तिमाहीत ३९,२७४ ट्रॅक्टरची विक्री  करत नोंदवली १८ टक्के वाढ

पुणे : सोनालिका ट्रॅक्टर्स या भारताच्या नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँडने आर्थिक वर्ष २०२३ च्या सुरुवातीपासूनच नवीन उत्पादन तसेच कामगिरीचे बेंचमार्क तयार केले आहेत आणि आता अभिमानाने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत ३९,२७४ ट्रॅक्टरच्या एकूण विक्रीची नोंद केली असून ती आर्थिक वर्ष २०२२ मधील याच कालावधीत नोंदवलेल्या एकूण ३३,२१९ ट्रॅक्टरच्या विक्रीपेक्षा  १८ टक्क्यांपेक्षा  जास्त आहे. पहिल्या तिमाहीतील वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून कंपनीने चालू आर्थिक वर्षात आपला प्रवास वेगवान केला आहे आणि आगामी हंगामांसाठी आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे.

भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक असलेले सोनालिका ट्रॅक्टर्स हे बाजारपेठांबद्दलचे त्यांचे सखोल ज्ञान प्रादेशिक ग्राहकांच्या मागणीशी जुळवून घेण्याच्या सुस्पष्ट उद्दिष्टाने आपल्या संपूर्ण हेवी ड्यूटी पोर्टफोलिओमध्ये लागू करतात. देशभरात अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेमुळे पीक उत्पादनावर परिणाम होऊनही सरकारने किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढविल्याने ग्रामीण भागातील रोखीचे व्यवहार सुलभ झाले आहेत. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२३  मध्ये ट्रॅक्टर्सची एकूण मागणी वाढली आहे. देशभरात मान्सूनचा विस्तार होत असल्याने, सोनालिका ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील दैनंदिन आव्हानांवर मात करण्यासाठी मदत करण्यात आघाडीवर राहतील.

पहिल्या तिमाहीतील कामगिरीचा हा नवीन टप्पा गाठण्याबाबत भाष्य करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले  की प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता केल्यामुळे आम्हाला उत्पादन आणि कामगिरी या दोन्ही बाबतीत नवीन बेंचमार्क सेट करण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. पहिल्या तिमाहीत १८ टक्क्यांच्या  वाढीसह ३९,२७४ युनिट्सचा आमच्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त विक्रीचा टप्पा गाठणे हा, आम्ही शेतकरी आणि त्यांच्या प्रादेशिक बाजाराच्या गरजा चांगल्याप्रकारे समजून घेतो याचा एक पुरावा आहे. त्यामुळे सोनालिका या ब्रँडवर शेतकर्यांतचा विश्वास आणखी मजबूत होत आहे. आमचा ट्रॅक्टर पोर्टफोलिओ कस्टमाईज करण्याच्या आमच्या अनोख्या पद्धतीच्या धोरणाचे पाठबळ असल्यामुळे आम्ही या वर्षातील नंतरच्या आगामी हंगामांसाठी आर्थिक वर्ष २०२३ ची दिशा योग्य दिशेने ठेवली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: