fbpx

बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत येणार – एकनाथ शिंदे

गुवाहाटी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप नेत्यांनी मंगळवारी राज्यपाल भागतसिंह कोशयारी यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर  एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार महाराष्ट्रात कधी परतणार याची प्रतीक्षा होती. याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्वत: माहिती देत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याचं सांगितलं. गुवाहाटीताल कामाख्या देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे आज गेले होते, तेथे त्यांनी ही माहिती दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्याला आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार परत येण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: