पोकर बाजीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पदी शाहीद कपूरची नियुक्ती
नवी दिल्ली: PokerBaazi.com या भारतातील सर्वात मोठ्या पोकर व्यासपीठाने आज त्यांचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवुड सुपरस्टार शाहीद कपूर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पोकरबाझीचा भारतातील पोकरसाठी प्रबळ परिसंस्था निर्माण करण्याचा मनसुबा आहे आणि शाहीद यांचा ब्रॅण्डसोबतचा सहयोग लोकांमध्ये पोकरबाबत लोकप्रियता व जागरूकता निर्माण करण्याप्रती त्यांच्या कटिबद्धतेशी संलग्न आहे.
शाहीद कपूर यांच्या नियुक्तीसह PokerBaazi.com लवकरच आधुनिक मार्केटिंग मोहिम राबवणार आहे, ज्यामध्ये आगामी दिवसांत टीव्हीसीच्या लाँचचा समावेश असेल. ही मोहिम सहयोगासोबत पोकर हा खेळ असल्याच्या ब्रॅण्ड मेसेजिंगला देखील चालना देईल, जेथे कोणीतरी त्यांच्या कौशल्यांसह या खेळामध्ये निपुण होऊ शकतात.
ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून शाहीद कपूर यांचे स्वागत करत बाझीगेम्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी नवकिरण सिंग म्हणाले, ”आम्हाला आमच्या पोकरबाझी कुटुंबाचे नवीन सदस्य म्हणून शाहीद यांची निवड करण्याचा आनंद होत आहे. शाहीद यांच्यासह आम्हाला आमच्या ब्रॅण्डसाठी परिपूर्ण सोबती मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वासह त्यांचे कौशल्यासह प्रयोग करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न नवीन खेळाला देशामध्ये इच्छित मान्यता मिळवून देण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी संलग्न आहेत. या सहयोगासह आम्ही भारतात पोकर परिसंस्था निर्माण करण्याच्या आणि घराघरामध्ये हा खेळ लोकप्रिय बनवण्याच्या आमच्या व्यापक ध्येयामध्ये पुढील पाऊल उचलत आहोत. आम्ही यशस्वी सहयोगासाठी उत्सुक आहोत आणि आमच्या आगामी मोहिमांसह आम्ही पोकरबाझी गाथेबाबत बहुमूल्य चर्चांना चालना देण्याची आशा व्यक्त करतो.”
या सहयोगाबाबत बोलताना शाहीद कपूर म्हणाले, ”पोकरबाझी या भारतातील सर्वात मोठ्या पोकर व्यासपीठासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे, जे या ब्रूइंग क्रांतीचे प्रमुख आहेत. त्यांच्या अनेक अद्वितीय वैशिष्ट्यांसह ऑनलाइन पोकर शिकणे व खेळणे अत्यंत सुलभ व जलद आहे आणि या प्रक्रियेमध्ये खेळाडूंना धोरणात्मकरित्या विचार करणे, जोखीमांचे व्यवस्थापन इत्यादींसारखी जीवनकौशल्ये निर्माण करण्यास मदत होते. आम्हा दोघांचा आमच्या संबंधित क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यावर, तसेच तसे करत असताना ग्राहकांचे मनोरंजन करण्याच्या इच्छाशक्तीवर विश्वास आहे आणि या विश्वासावर आमचा सहयोग संचालित आहे. मी पोकरबाझीला व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास आणि भारतात या खेळाची अधिक लोकप्रियता निर्माण करण्यास मदत करण्यासाठी उत्सुक आहे.”
