महाराष्ट्रातील खेळाडूंनी विजयी कामगिरीसह उध्दघाटनाचा दिवस गाजवला !
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२२ खुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्न्वॉश स्पर्धा
पुणे आयस्क्वॉश अॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२२ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेच्या विविध गटामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उध्दघाटनाच्या दिवस गाजवला.
ही ३-स्टार एसआरएफआय राष्ट्रीय स्पर्धा मुंढवा येथील चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आजपासून सुरू झाली. स्पर्धेमध्ये भारतातील २१ राज्यांतील ५६३ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
१५ वर्षाखालील गटाच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या अर्थव मेंढे याने नवव्या मानांकित झारखंडच्या विराज जयस्वाल याच्यावर संघर्षपूर्ण विजय नोंदविला. अर्थवने विराजचा १४-१२, ११-६, ३-११, ३-११, ११-९ असा पाच सेटमध्ये पराभव केला. याच गटात पश्चिम बंगालच्या विहान छलान याने महाराष्ट्राच्या स्वर साबू याच्यावर १२-१०, ११-५, ९-११, ११-६ असा विजय मिळवला. आतिक यादव या महाराष्ट्राच्या खेळाडूने चंदीगढच्या उचीत सोनी याचा ९-११, ११-५, ११-७, १२-१० पराभव केला. महाराष्ट्राच्या अमेश दत्ता याने उत्तरप्रदेशच्या विहान गुप्ता याचा ११-१, ११-२, ११-९ असा सहज पराभव केला.
स्पर्धेचे संक्षिप्त निकालः पहिली फेरीः
पुरूष गटः सनी यादव (महा) वि.वि. आरीव्ह दमानी (मध्यप्रदेश) ११-१, ११-१, ११-१;
स्वराज दालमिया (पश्चिम बंगाल) वि.वि. नमन दुबे (मध्यप्रदेश) ११-७, ११-२, ११-५;
एकबिर सिंग (महा) वि.वि. हार्दीक गुप्ता (पश्चिम बंगाल) ११-७, ११-२, ११-४;
सिध्दांत पाटील (केरळ) वि.वि. आयुष किरण (कर्नाटक) ११-३, ११-३, ११-२;
प्रज्ञेश मोरे (महा) वि.वि. संकल्प सिंग (चंदीगढ) ११-३, ११-२, ११-२;
रूद्र लखानी (महा) वि.वि. हृधान शहा (महा) ११-४, ११-८, ११-४;
देव शर्मा (महा) वि.वि. उदीत शर्मा (महा) ११-६, १०-१२, ११-९, ११-९;
कृष्णा देरवडा (महा) वि.वि. आदित्य भंडारी (उत्तराखंड) ११-४, ०-११, ११-६, ११-५;
११ वर्षाखालील गटः अरमान चौधरी (महा) वि.वि. केतन सांब्रे (महा) ११-५, ११-७, ४-११, ११-८;
कौशल सिंघवा (महा) वि.वि. अंश मल्होत्रा (महा) ११-२, ११-१, ११-३;
रोहन दरवाडा (महा) वि.वि. सांश मल्होत्रा (महा) ११-१, ११-०, ११-१;
सिध्दांत रंजीथ (महा) वि.वि. मोहन सिंगवा (महा) ११-४, ११-२, ११-३;
१३ वर्षाखालील गटः
ज्योएल दिनकरन (तामिळनाडू) वि.वि. रिधीम पोनेकर (महा) ११-२, ११-१, १२-१०;
अर्जुन केजरीवाल (महा) वि.वि. आयान अलि (मध्यप्रदेश) ११-८, ११-५, ११-२;
कमलेश दमढेरे (महा) वि.वि. आदित्य मयुर (महा) ११-३, ११-४, ११-५;
अर्णव धारीया (महा) वि.वि. रामंजुन सुरेश (तामिळनाडू) ११-०, ११-०, ११-०;
विवान खन्ना (महा) वि.वि. अर्णव देवसिंग रावत (तामिळनाडू) ११-२, ११-०, ११-१;
हर्ष जोशी (महा) वि.वि. इझान कोतवाल (महा) ११-३, ११-२, ११-३;
१५ वर्षाखालील गटः
विहान छलान (पश्चिम बंगाल) वि.वि. स्वर साबू (महा) १२-१०, ११-५, ९-११, ११-६;
अर्थव मेंढे (महा) वि.वि. विराज जैस्वाल (झारखंड, मानांकन-९) १४-१२, ११-६, ३-११, ३-११, ११-९;
आतिक यादव (महा) वि.वि. उचीत सोनी (चंदीगढ) ९-११, ११-५, ११-७, १२-१०;
अमेश दत्ता (महा) वि.वि. विहान गुप्ता (उत्तरप्रदेश) ११-१, ११-२, ११-९;
