fbpx

विशुद्ध भारतीय संस्कारांची देशाला गरज : सुनील देवधर

पुणे : कृतज्ञता हा देशवासीयांचा सर्वात मोठा स्थायीभाव आहे. कुटुंबातील आई ही कृतज्ञतेचे मूर्तीमंत रूप आहे. ऋषी बंकिमचंद्र यांनी भारत देशाला मातेच्याआदिशक्तीच्या रूपात पाहिले. भारतमातेविषयीची लुप्त होत चाललेली संकल्पना त्यांनी ‘वंदेमातरम्‌‍‘ या महामंत्राच्या माध्यमातून संपूर्ण देशाला दिली. त्यांच्या या शब्दातून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे ती विशुद्ध भारतीय संस्कारांची. हे विचार घराघरात पोहोचले पाहिजेतअशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि ‘वंदेमातरम्‌‍‘ या महामंत्राचे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून मिलिंद सबनीस लिखित ‘ऋषी बंकिमचंद्र‘ या ग्रंथाचे प्रकाशन सुनील देवधर यांच्या हस्ते आज फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटर येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णीप्रकृती केअर फाउंडेशनचे डॉ. ज्ञानोबा मुंडे आणि जटायु अक्षरसेवाचे संतोष जाधव विचारमंचावर होते.

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण झाले पाहिजे हा मुद्दा अधोरेखित करून सुनील देवधर पुढे म्हणालेमातृभाषेतून जे समजते ते अनुवादित साहित्यातून समजत नाही. त्यामुळे ऋषी बंकिमचंद्र यांच्यावर मराठी भाषेत आलेला ग्रंथ येणाऱ्या पिढीवर संस्कार करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरेलअसे सांगून नव्या शिक्षण नितीची उपयुक्तता विशद केली. धर्म ही विशुद्ध भारतीय संकल्पना आहे. या संकल्पनेला पर्यायवाची शब्द नाही तर धर्म हा विचार आहेजो समाजाला जोडतो.

आपल्या पूर्वजांनी शाश्वत विचारांची मांडणी केली आहे. या विचारांना आचरणात आणणाऱ्या समाजाची आज आवश्यकता आहे. चरित्रातून हिंदुत्व जगणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता आहे. आजच्या काळातील सोशल मीडियाचा संदर्भ देऊन हिंदुनो सोशल मीडिया योद्धे बना असे आवाहन करून ते म्हणालेहिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजेयासाठी शस्त्र म्हणून कायद्याचे प्राथमिक ज्ञान करून घ्यामाहिती अधिकार कायदा जाणून घ्या.

ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीस यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका विषद केली. धनंजय कुलकर्णीसंतोष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. रवींद्र मिणियार यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम पाटील यांनी केले तर आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता हिमानी नांदे यांनी गायलेल्या वंदेमातरम्‌‍ने झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: