Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

शिवसेना दुसर्‍यादिवशीही आक्रमक बंडखोर आमदारांच्या प्रतिमात्मक पुतळ्याची काढली अंत्ययात्रा

पुणे : राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व  आमदारांनी बंड पुकारले त्याने राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून. परवा पासून राज्यात शिवसेनेने एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार यांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करत आहे. आज पुण्यात शिवसेने हडपसर येथे एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली.

हि रॅली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला समीर तुपे, विधानसभा प्रमुख, राजेंद्र बाबर, महिला शहर प्रमुख संगिता ठोसर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, हडपसर उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर यावेळी उपस्थित होते.हडपसर भागातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय देशमुख म्हणाले, ज्या आमदारांना उद्धव ठाकरे साहेबांना संभाळले .त्या उद्धव ठाकरे साहेबांना आमदारांनी धोका दिला .हे अतिशय दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे हे फक्त शिवसैनिकांचा विचार करत असतात. या आमदारांपैकी काही आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद दिले आहेत.

मंत्री पद देताना ठाकरेंनी आमदार मला धोका देतील असा कुठलाही विचार केला नव्हता.हे आमदार ज्यादिवशी महाराष्ट्रातील त्या दिवशी आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आम्ही अंतयात्रा या आमदारांच्या पुतळ्याची काढत आहोत. असे विजय देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading