ED च्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले, माझी मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नाही
मुंबई-राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षादरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. उद्या ईडीच्या कार्यलायमध्ये हजर राहण्याचे समन्स संजय राऊत यांना बजावण्यात आले आहेत. पत्राचाळ प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळेच आधीच सत्तासंघर्षामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतही आता ईडीच्या या समन्समुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रवीण राऊत यांनी ईडीसमोर केलेल्या खुलाश्यांच्या आधारे हे समन्स बजावण्यात आलेत.
संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले की, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा! जय महाराष्ट्र! शिवाय, संजय राऊत यांनी हे ट्विट थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a
