Thursday, June 4, 2026
ENTERTAINMENTLatest News

अँड टीव्ही वरील मालिकांमध्ये घडणार रहस्‍यमय घटना!

या आठवड्यात एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘बाल शिव’, ‘और भई क्‍या चल रहा है’, ‘हप्‍पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मधील पात्र अविश्‍वसनीय आव्‍हानांचा सामना करणार आहेत. 

‘बाल शिव’मधील एपिसोडबाबत सुमती म्‍हणाली, ”ऋषी कट्यायन (मनोज कोल्‍हटकर) बाल शिवला (आन तिवारी) दुखापत करण्‍याचा प्रयत्‍न करतात, ज्‍यामुळे देवी कट्यायनीला (त्रिशा आशिष सरदा) राग येतो. दुसरीकडे दंडपानी बाल शिवला ठार करण्‍यामध्‍ये अयशस्‍वी ठरल्‍यामुळे तारकासूर (कपिल निर्मल) त्‍याच्‍यावर रागावतो. आपल्‍या मुलीला परत मिळवण्‍यासाठी ऋषी कट्यायन अग्‍नी समाधी घेण्‍याचे ठरवतात. दुसरीकडे, देवी कट्यायनी बाल शिवला कैलाशबाबत विचारते आणि तो तिला त्‍या स्‍थळाचा सौंदर्याबाबत सांगतो. 

‘और भई क्‍या चल रहा है?’मधील जफर अली मिर्झा म्‍हणाले, ”सकिनाने (आकांशा शर्मा) बनवलेल्या मांसाहाराच्या वासाने शांतीला (फरहाना फातिमा) राग येतो. इतका की सकिना मोहल्‍लामध्‍ये फिश पार्टी देते, ज्‍यामुळे दोघींमध्‍ये मोठे भांडण होते. यादरम्‍यान आदी हवेलीची अर्धी रक्‍कम देण्‍याची ऑफर करतो आणि उर्वरित अर्धी रक्‍कम देणारे कुटुंब हवेलीचे मालक बनतील. मिर्झा (पवन सिंग) व मिश्रा (अंबरिश बॉबी) दोघेही ५० लाख रूपयांची व्‍यवस्‍था करण्‍याच्‍या तयारीला लागतात. 

‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाले, ”राजेश (कामना पाठक) हप्‍पूकडे (योगेश त्रिपाठी) एअर कूलरची मागणी करते, पण कटोरी अम्‍मा (हिमानी शिवपुरी) त्‍याबाबत नकार देते. रागावलेली राजेश गब्‍बर व बिमलेश (सपना सिकरवार) यांच्‍या मदतीने बनावटी कथा रचते की ती जलपरी आहे आणि जिवंत राहण्‍यासाठी थंड वातावरणाची गरज आहे. सर्वांसह हप्‍पूचा त्‍यावर विश्‍वास बसतो आणि ते स्विमिंग पूलप्रमाणे मोठ्या आकाराचा पाण्‍याच्‍या टबची व्‍यवस्‍था करून त्‍या टबमध्‍ये बर्फ टाकतात. हप्‍पू कमिशनरला (किशोर भानुशाली) राजेश जलपरी असल्‍याबाबत सांगतो. 

 ‘भाबीजी घर पर है’मधील  विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले, ”मास्‍टरजी (विजय कुमार सिंग) विभुतीला (आसिफ शेख) तो नैनीतालमध्‍ये जाणार असल्‍यामुळे शाळेमध्‍ये त्‍याचा सुट्टीचा अर्ज देण्‍यास सांगतो. दरम्‍यान प्रेम (विश्‍वजीत सोनी) विभुतीला बक्षीच्‍या पार्टीमध्‍ये येण्‍याचे आमंत्रण देतो आणि त्‍याचवेळी अनिता (विदिशा श्रीवास्‍तव) विभुतीला तिवारीच्‍या (रोहिताश्‍व गौड) घरी डिनरबाबत सांगते. विभुती अनिताला खोटे सांगतो की, मास्‍टरजीला न्‍यूमोनिया झाला आहे आणि हॉस्पिटलला जात आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading