fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

रोटरीच्या वतीने १० मेट्रो स्टेशन्स वर विशेष सुविधा

पुणे : रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने पुण्यातील १० मेट्रो स्टेशन्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या विशेष सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत. यासंदर्भातील रोटरी महामेट्रो सुविधा प्रकल्पाचे लोकार्पण २९ जून रोजी करण्यात येणार आहे.

रोटरी प्रांत ३१३१’च्या वतीने आणि रोटरीच्या पब्लिक इमेज टीमच्या वतीने प्रांतपाल पंकज शहा आणि सहकाऱ्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी विनोदकुमार आगरवाल, क्रांती शाह हे उपस्थित होते.

पंकज शहा म्हणाले,’ पुण्यात मेट्रो चे आगमन झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यांना आणखी उपयुक्त सुविधा मिळाव्यात यादृष्टीने रोटरी क्लब १० स्टेशन्स वर विविध उपयुक्त गोष्टी देत आहे. यामध्ये वॉटर प्युरिफायर,ए ई डी मशीन आणि ६५ इंची टी व्ही सेट्स चा समावेश आहे. या सुविधा प्रकल्पांतर्गत एकूण १० प्युरिफायर ,२० टी व्ही संच ,एकूण १० ए ई डी मशिन्स (ऑटोमेटेड एक्स्टर्नल डीफ्रायबिलेटर्स ) देण्यात येणार आहेत.प्रवाशाला चुकून हृदयविकाराचा त्रास झाल्यास प्रथमोपचार करण्यास उपयोग होणार आहे.

रोटरी क्लब ३१३१ चे प्रांतपाल पंकज शहा आणि प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत २९ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनवर या सुविधांच्या लोकार्पणाचा सोहळा होणार आहे. त्याआधी साडेदहा वाजता प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. यावेळी मेट्रो प्रकल्पाचे मान्यवर अधिकारी आणि रोटरीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या सुविधा आम्ही मेट्रोच्या माध्यमातून पुणेकर प्रवाशांना देत आहोत ,असे यावेळी सांगण्यात आले.

आजपर्यंत १० लाख लोकांनी मेट्रो प्रकल्पाचा लाभ घेतला आहे. भविष्यात याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत जाणार आहे यामुळे रोटरीने पुढाकार घेऊन या प्रकल्पाचा विचार केला, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

रोटरी क्लब लोकमान्य नगर,रोटरी क्लब पुणे पाषाण,रोटरी क्लब पुणे वेस्ट ,रोटरी क्लब पुणे ‌खडकी,रोटरी क्लब‌ पुणे डायनॅमिक भोसरी,रोटरी क्लब पुणे साउथ ,रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर,रोटरी क्लब विस्डम, रोटरी क्लब मेट्रो, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप सोसायटी,अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट,
रवजित इंजिनिअर स्पेशालिटी लि.,पूजा इंजिनियर्स ,प्रकाश कन्स्ट्रक्शन कं.,पुणे हार्ट ब्रिगेड या सर्वांचे या प्रकल्पासाठी रोटरी प्रांत ३१३१ यांना सहकार्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading