fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

स्पार्टन मान्सुन लीग- रायझिंग बॉईज, रायझिंग स्टार्स एमराल्ड, कल्याण क्रिकेट क्लब संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !

पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत रायझिंग बॉईज, रायझिंग स्टार्स एमराल्ड आणि कल्याण क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत जय जे. याच्या ७८ धावांच्या खेळीमुळे रायझिंग बॉईज संघाने ऑरेंज आर्मी संघाचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑरेंज आर्मी इलेव्हन संघाने अभिषेक बोधे याच्या ७४ धावांच्या जोरावर १८.१ षटकात २०३ धावांचे आव्हान उभे केले. याचा पाठलाग करताना रायझिंग बॉईजच्या जय जे. याने ४२ चेंडूत ५ चौकार व ७ षटकारांसह ७८ धावांमुळे तसेच ओम साळुंखे (३२ धावा), विग्नेश पालवणकर (३८ धावा) आणि रोहन साळुंके (३४ धावा) यांच्यामुळे अखेरच्या षटकात आव्हान पूर्ण केले.

हेमंत पाटील याच्या अष्टपैलू खेळीमुळे रायझिंग स्टार्स एमराल्ड संघाने सन्डे क्रिकेट क्लबचा ११० धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायझिंग स्टार्स एमराल्ड संघाने २० षटकात १० गडी गमावून १७६ धावा धावफलकावर लावल्या. हेमंत पाटील याने ६३ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना सन्डे क्रिकेट क्लबचा डाव ६० धावांवर संपुष्टात आला.

रोहीत गुगळे याच्या नाबाद ८३ धावांच्यामुळे कल्याण क्रिकेट क्लबने सॅफरॉन क्रिकेट क्लबचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सॅफरॉन क्रिकेट क्लबने १५९ धावांचे आव्हान उभे केले. यश गद्रे (३३ धावा), गणेश महापुरे (३१ धावा) आणि शिवम ठोंबर (२४ धावा) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभी केली. हे आव्हान कल्याण क्रिकेट क्लबने १३.४ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. रोहीत गुगळे (नाबाद ८३ धावा), केतन परमान (नाबाद ४३ धावा) आणि रूत्विक महाजन (३३ धावा) यांनी भक्कम फलंदाजी करून संघाला विजयी सलामी मिळवून दिली.

स्पर्धेचे उद्घाटन क्रिकेट प्रशिक्षक उपेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक अमित देशपांडे, विवेक कुबेर आणि ऋषिकेश पुजारी, सहभागी संघाचे खेळाडू उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading