Ahammune Biosciences, Veeda Clinical Research च्या भागीदारीत नवीन त्वचारोग औषधांसाठी घोषणा
पुणे : पुणे स्थित Ahammuneबायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड आणि अहमदाबाद स्थित Veedaक्लिनिकल रिसर्च लिमिटेड यांनी त्वचारोगासाठी स्थानिक उपचार पद्धती म्हणून विकसित केलेल्या Ahammuneच्या नवीन अन्वेषणात्मक औषध- AB1001 च्या सोबत प्रथम मानवी अध्ययनाच्या बाबतीत भागीदारीची घोषणा केली आहे.AB1001 चे प्राथमिक संशोधन पुण्यातील अहममुनेच्या R&D प्रयोगशाळेत करण्यात आले होते जे हे सिद्ध करते की हे औषध त्वचारोग उपचारांसाठी सुरक्षित आणि प्रभावी दोन्ही आहे.
त्वचारोग किंवा ल्युकोडर्मा ही त्वचेची एक स्वयंप्रतिकार अवस्था आहे ज्यामुळे आपल्या शरीरावर पांढरे किंवा हलक्या रंगाचे ठिपके तयार होतात.ही एक आजीवन अवस्था आहे आणि या पांढर्या ठिपक्यांची सध्याचे उपचार पर्याय केवळ तात्पुरते आणि लक्षणात्मक आराम देतात, ज्यामुळे उपचारांची एक प्रचंड अपूर्ण जागतिक गरज निर्माण झाली आहे.या आजाराशी अनेक गैरसमज निगडीत आहेत ज्यामुळे रुग्णांना अनेकदा बहिष्कृत केले जाते.याबरोबरच, स्वरूप बदलण्याच्या भीतीचा रुग्णाच्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो.दोन्ही कंपन्यांचा – Ahammuneबायोसायन्सेस आणि Veedaक्लिनिकल रिसर्च – या नवीन औषधामध्ये त्वचारोगावर उपचार करण्याची मोठी क्षमता असल्याचा अंदाज आहे.
नवीन उपचारांबद्दल बोलताना, Ahammuneबायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक, डॉ. पारुल गंजू म्हणाले, “आमचे नवीन अन्वेषणात्मक औषध AB1001 विकसित करणे हे Ahammuneच्या टीमच्या अनेक वर्षांच्या परिश्रमाचे आणि रूग्णांचे जीवन सुधारण्यासाठी वैज्ञानिक नवकल्पनांचे रूपांतर करण्याच्या ध्येयाशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे फलित आहे.हा त्वचारोग एक कमकुवत करणारा रोग आहे ज्यामध्ये मेलेनोसाइट्सवरील स्वयंप्रतिरोधक हल्ल्यामुळे पांढरे ठिपके तयार होतात.रोगाचे तीव्र स्वरूप आणि उपचार पर्यायांचा अभाव रुग्णांसाठी त्रासदायक आहे.ही कमतरता समजून
घेऊन, आम्ही रोगासाठी एक नवीन उपचार मार्ग शोधून काढला आहे आणि या मार्गाला लक्ष्य करणारे उपचारात्मक रेणू विकसित केले आहेत.आमचे मानवी चाचणी-पूर्ण संशोधन हे सिद्ध करतात की आमच्या रेणूंमध्ये रोगाची प्रगती थांबवण्याची आणि त्वचेचे रंगद्रव्य पूर्ववत करण्यास साहाय्य करण्याची क्षमता आहे.लाखो रूग्णांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या आशादायी नवीन उपचारांसाठी AB1001 सोबत प्रथम मानवी अभ्यासात Veedaसोबत भागीदारी करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”
दोन्ही कंपन्यांमधील भागीदारीबद्दल भाष्य करताना, Veedaक्लिनिकल रिसर्च लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अजय टंडन म्हणाले, “आम्ही सध्या उपलब्ध असलेल्या उपचारांच्या तुलनेत त्वचारोगाच्या नवीन उपायांच्या वैद्यकीय विकासामध्ये Ahammuneबायोसायन्सेससोबत भागीदारी करण्याचे सौभाग्य प्राप्त केले आहे. Veedaक्लिनिकल रिसर्च, त्यांची उपकंपनी बायोनीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि संयुक्त उपक्रम कंपनी Ingenuity बायोसायन्सेससह, आमच्या मानवी चाचणी-पूर्व आणि सुरुवातीच्या आणि शेवटच्या टप्प्यातील वैद्यकीय संशोधन क्षमतांमध्ये आरोग्यसेवेच्या अपूर्ण गरजांसाठी नवीन उपचार विकसित करण्याकरता नाविन्यपूर्ण बायोटेक कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवेल.”
