34 आमदारांनी महाविकास आघाडी सारकारचा पाठिंबा काढला
मुंबई : बंडखोर आमदारांवरील कारवाई करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी शिंदे गटाकडून सादर केलेल्या याचिकेत ‘आम्ही 34 आमदारांनी महाविकास आघाडीसारकारचा पाठिंबा काढला असल्याचा’ दावा करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसारकार अल्पमतात आले असून ठाकरे सारकारपुढील संकट अधिक गहिरे झाले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीसारकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा याचिकेत केला असला तरी जोवर विधीमंडळात अविश्वास ठराव पारित होत नाही तोपर्यंत या दाव्याला अर्थ नाही, असे कायदे तज्ञांचे मत आहे. शिवाय बंडखोर आमदारांनी राज्यपाल किंवा विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठिंबा काढल्याचे पत्र दिलेले नाही. त्यामुळे न्यायालयातही ही बाब किती ग्राह्य धरली जाते याबाबत शंका आहे.
