fbpx

रत्नगिरीच्या लक्ष्मी ढेकणे ठरल्या ११ लाखांच्या पैठणीच्या मानकरी

होम मिनिस्टरच्या महामिनिस्टर पर्वाच्या विजेतील ११ लाखांची पैठणी मिळणार हे ऐकून अनेकांनी तोंडात बोटं घातली. हि ११ लाखांची पैठणी पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. अखेर या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगली. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या १० जणींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी सामना रंगला आणि फायनलिस्ट वहिनींना टक्कर देत रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे वहिनी ठरल्या महामिनिस्टरच्या महाविजेत्या. ११ लाखांची पैठणी आदेश भाउजीनी वहिनींना बक्षीस म्हणून दिली. या पैठणीला सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडलेले आहेत. हि पैठणीला जिंकल्यावर वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

Leave a Reply

%d bloggers like this: