fbpx

शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याची काढली अंत्ययात्रा

पुणे:राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व 30 40 आमदारांनी बंड पुकारले त्याने राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून.
काल पासून राज्यात शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करत आहे. आज सकाळी पण राज्यात विविध ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला जोडो मार करत आंदोलन करण्यात आले. आज पुण्यात शिवसेने तर्फे सावित्रीबाई फुले स्मारक, टिंबर मार्केट, भवानी पेठ ते संत कबीर चौक, नाना पेठ येथे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत रॅली काढली.

ही रॅली शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या रॅलीला शहरप्रमुख गजानन थरकुडे, सविता मते, प्रशांत बधे आनंद मंजाळकर,उमेश वाघ, प्रशांत राणे राजू पवार,अजय शिंदे,विलास सोनवणे, गोविंद निंबाळकर,हेमंत यादव,प्रवीण डोंगरे, संजय डोंगरे, तेजस मर्चंट अतुल दिघे, हरिश्चंद्र सपकाळ पुणे शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय मोरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली.ती एकदम चुकीची आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन माफी मागितली पाहिजे शिवसेना अख्या राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना नगरविकास मंत्री पण दिले. याचा एकनाथ शिंदे यांनी गैरफायदा घेतला. एकनाथ शिंदे जर महाराष्ट्रात आले तर त्यांना आम्ही विरोध करणार आहोत म्हणून आज आम्ही त्यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत आहोत असे संजय मोरे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: