fbpx

बंडखोर आमदारांवर पक्षविरोधी कारवाया केल्या तर घटनेनुसार कारवाई होणार -सचिन अहिर

पुणे : एकनाथ शिंदे व काही बंडखोर आमदारांनी वेगळा गट व पक्ष स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेने या आमदारांचे निलंबन व्हावे म्हणून याचिका दाखल केली आहे .शिवसेना पक्षविरोधी आमदारांवर कारवाई करणार का असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे .त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत .पण पक्षविरोधी कारवाया केल्या तर घटनेनुसार कारवाई होणार असल्याचा इशारा पुण्याचे जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे आमदार सचिन आहेत पुण्यात पत्रकारांशी बोलताना इशारा दिला.
आज पुण्यात शिवसेनेचा शहर पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता मेळावा संपल्यानंतर सचिन अहिर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सचिन अहिर म्हणाले, काही लोक मीडियात चुकीची माहिती पसरवत आहेत. जे लोक समज गैरसमज पसरवत आहेत की आम्ही शिवसेनेत आहोत.आम्ही कधी पक्ष सोडला आहे आणि हीच मंडळी आता सुरू असलेली पंढरीची वारी सोडून सुरत आणि गुवाहाटीला गेले आहेत, अशी टीका आणि सचिन अहिर यांनी केली आहे.
बंडखोर आमदार त्यातही नुकतेच गुवाहाटीला गेलेले आमदार उदय सामंत यांच्याविषयी सचिन अहिर म्हणाले,
उदय सामंत अजून तेथे पोहोचले नाहीत. अशी माझी माहिती आहे. मात्र कालपर्यंत जिवाभावाचे लोक सोबत होते. पण आज तेच निघून जाताना दुःख होत आहे. त्यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. मात्र त्यांना त्यांची चूक नक्की लक्षात येईल, असा आशावाद सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे. पार्टीच्या विरोधात तुम्ही काम केले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे संविधानात सांगितले आहे, याची आठवण यावेळी सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांना करून दिली. जी वस्तुस्थिती आज राज्यात आहे. ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असे सचिन अहिर म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: