fbpx

राज्यात 2 – 3 दिवसात भाजपचे सरकार येणार; रावसाहेब दानवे यांचा दावा

मुंबई : राज्यात दोन ते तीन दिवसात भाजपचे सरकार येणार आहे, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाट्यमध्ये भाजपचा हात असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप हे आरोप फेटाळत आहे. त्यातच दानवे यांनी एका कार्यक्रमात येणाऱ्या दोन ते तीन दिवसात भाजपचे सरकार येईल, असा दावा केला आहे.

याबाबतचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीवर सध्या टांगती तलवार आहे. शिवसेनेतील अनेक आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात जात आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारचे नेमके काय होणार हे अजूनही स्पष्ट होत नाही.

शिंदे यांनी बंड केल्यापासून यामध्ये भाजपचाच हात आहे असे आरोप केले. मात्र भाजपने हे आरोप फेटाळले मात्र आता दानवे यांनीच एका कार्यक्रमात मोठा दावा केला आहे. दोन ते तीन दिवसात भाजपचे सरकार येईल असे त्यांनी विधान केले आहे.

शिंदे यांनी प्रस्ताव दिला तर विचार करु असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते. आता दानवे यांनी केलेल्या दाव्यानुसार सरकार कसे स्थापन होणार हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: