Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर… एकनाथ शिंदे यांचे ट्विट

मुंबई : राज्यात सरकार नविन येणार की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्यात आता चांगलीच झुंपली आहे. शिवसेनेतुन बंड केलेले एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे.

शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर… तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…’

पुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading