fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsLIFESTYLE

टीटीके प्रेस्टीजतर्फे नाविन्यपूर्ण स्वच्छड्यूओगॅस स्टोव्ह सादर

पुणे  :भारतातील अग्रगण्य किचन अप्लायन्सेस ब्रँड टीटीके प्रेस्टीजने स्वच्छताड्यूओ गॅस स्टोव्ह सादर करत स्वयंपाकघरातील नाविन्यपूर्णतेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सहजता आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेला स्वच्छड्यूओ उचलता येण्याजोग्या बर्नरसह येतो जेणेकरून घरी स्वयंपाक करणाऱ्यांना बर्नर उचलता येतो आणि साफसफाईचा अत्यंत सुलभ अनुभव मिळतो.

हे उत्पादन देशभरात केलेल्या विस्तृत संशोधनातून पुढे आले आहे ज्यात असे दिसून आले आहे की वापरानंतर गॅस स्टोव्ह साफ करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे गृहिणी अधिकाधिक निराश होतात. ग्राहकांच्या या तक्रारीकडे लक्ष देत टीटीके प्रेस्टीज स्वच्छड्यूओ गॅस स्टोव्ह त्यातील उचलता येण्याजोग्या बर्नरसह साफसफाईची प्रक्रिया सहज आणि सुरक्षित करतो. खास भारतीय स्वयंपाकघरांसाठी डिझाइन केलेला स्वच्छड्यूओ गॅस स्टोव्ह हा सोय, देखणेपणा, वापरातील सुलभता आणि अधिकची कार्यक्षमता यांना प्राधान्य देणाऱ्या व्यग्र होममेकर्ससाठी आहे. याचा उत्कृष्ट ६ मिमी टफनड् ग्लास आकर्षक ड्युअल टोन फिनिशमध्ये येतो त्यामुळे स्वयंपाकघराला शान येते.

स्वच्छड्यूओ गॅस स्टोव्ह चार वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे त्यामुळे घरी स्वयंपाक करणाऱ्यांना निवड करताना पेच होऊ शकतो. यामध्ये दोन व तीन बर्नर गॅस स्टोव्ह तसेच दोन चार बर्नर आवृत्त्यांचा समावेश आहे. फक्त ३ आणि ४ बर्नर मॉडेल्समध्ये उपलब्ध असलेले जंबो बर्नर स्वयंपाक प्रक्रियेला गती देण्यासाठी योग्य आहे.स्वच्छड्यूओ गॅस स्टोव्हमध्ये उचलता येण्याजोग्या बर्नर सेटमध्ये एक प्रशस्त ड्रिप ट्रे आहे. तो अधिक अन्न कचरा गोळा करतो. या वैशिष्ट्यामुळे साफसफाईची प्रक्रिया सुलभ होते. एर्गोनॉमिक नॉब्स आणि मजबूत पॅन सपोर्टसह प्रत्येक छोट्या तपशीलाचा यात विचार केला गेला आहे.

स्वच्छड्यूओ हा गॅस स्टोव्ह आयएसआय प्रमाणित आहे. २-बर्नर मॉडेलची किरकोळ किंमत ८२४५ रुपये आहे, तर तीन बर्नर मॉडेलची किंमत १०९४५  रुपये आहे. चार बर्नर मॉडेल १३३९५ रुपये आणि १३८९५ रुपयांत खरेदी केले जाऊ शकतात. ही रेंज प्रेस्टीज एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, निवडक डीलर आउटलेट्स, एक्सक्लुसिव्ह ई-स्टोअर आणि इतर आघाडीच्या ईकॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading