Friday, October 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना अनेक मानाची पदं दिली. मात्र त्यांनी बंड केले. आता त्यांना जो निर्णय घ्यायचाय तो त्यांना घेऊदया. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही. शिवसेना बाळासाहेबांची होती, आहे आणि राहील, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा’, असे एकनाथ शिंदे गटाला ठणकाऊन सांगितले.

आज दुपारी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या बैठकीत बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराधारे नुसार शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव व चिन्ह कोणालाही वापरता येणार नाही. असे केल्यास बंडखोरांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीतील ठळक मुद्दे – 

  • शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती, आहे आणि राहील,
  • बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील
  • बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव व चिन्ह कोणालाही वापरता येणार नाही
  • शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे.
  • शिवसेनेची मराठी अस्मिता आणि हिंदूतवाशी नाते अतूट
  • बंडखोर आमदारांना बाजू मांडण्यासाठी 27 जूनला संध्याकाळी 5.30 वा. वेळ दिला

Leave a Reply