अन्यथा जशास तसे उत्तर देणार, फुलं वाहत तानाजी सावंत यांच्या समर्थकांचा इशारा
पुणे:पुण्यातल्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन सातारा रोड वरील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. आहे. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी धनकवडी येथील ऑफिसमध्ये गुलाबाची फुले टाकली आहेत.
सकाळी शिवसैनिकांनी या कार्यालयाची तोडफोड केली होती. तानाजी सावंत यांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला
होणे निषेधार्ह आहे. आम्ही गुलाबाची फुले टाकून तानाजी सावंत यांना समर्थन देतो, असे या समर्थकांनी म्हटले आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. सावंत साहेबांनी शांततेचे अवाहन केले आहे, अन्यथा जशास तसे उत्तर देणार, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे. तानाजी सावंत आगे बढो, हम तुम्हारे साथ हो, अशी घोषणाबाजी यावेळी तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी देत कार्यालयात फुले टाकली