fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोणत्याही परिस्थितीत कोंग्रेस, राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही – दीपक केसरकर (एकनाथ शिंदे गट)

मुंबई : आम्ही शिवसैनेच्या तिकिटावर निवडून आलो आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. परंतु आमचा वेगळा गट आहे. जो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा आहे. आम्ही आल्यावर विधानसभेत आमचे बहुमत सिद्ध कररू पण कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा कोंग्रेस आणि राष्ट्रवादीला नसणार आहे, असे स्पष्ट विधान बंडखोर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच राज्यातील परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर महाराष्ट्रात येवू असेही केसरकरांनी सांगितले.

दीपक केसरकर म्हणाले –  

  • आम्ही सर्वजण शिवसेनेचेच नेते आहोत
  • आम्ही कोणाच्या दबावाखाली नाही
  • भाजप सोबतच्या युतीमध्ये आम्ही राहू असे आमचे मत होते व आहे
  • 2/3 मताधिक्य आवश्यक असतात, तो आमच्याकडे आहे. त्यामुळे गटनेता आम्हीच निवडणार
  • विधीमंडळातील नेते हे एकनाथ शिंदे हेच असणार
  • बाळासाहेबांचे विचार मांडणारे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत.
  • 55 आमदारांचा नेता 16 जण कसे घेणार?
  • शिवसैनिकांना रस्त्यावर येण्याची गरज नाही, मुंख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे
  • आम्ही शिवसैनेच्या तिकिटावर निवडून आलो आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत
  • विधीमंडळात शिवसेना म्हणून आम्हीच आहोत
  • बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे ते आम्हाला अपात्र ठरवू शकत नाही
  •  शिवसेनेला कोणीही हायजॅक केलेली नाही. तो प्रयत्न कोंग्रेस आणि राष्ट्रवादीने केला
  • आम्ही नोटीसांना कायदेशीर उत्तर देऊ
  • आम्ही शिवसेनेतून बाहेर बडलोय असं भासवल जातंय तस नाहीये
  • आम्हाला आमचा गट स्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. तसे न झाल्यास आम्ही कायदेशीर लढाई देऊ

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading