दुसर्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे २५ जून पासून आयोजन !
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक अमित देशपांडे, विवेक कुबेर आणि ऋषिकेश पुजारी यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून आंतरक्लब स्पर्धेत एकूण १४ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. सलग दुसर्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करताना यावेळी सहभागी संघांची संख्या वाढविण्यात आली आहे. आठवड्याच्या दर शनिवारी आणि रविवारी स्पर्धेचे सामने होणार आहेत.
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत ब्रेव्ह हार्टस् क्रिकेट क्लब, ११ स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब, कल्याण क्रिकेट क्लब, पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, रायझिंग बॉईज क्रिकेट क्लब, सॅफरॉन क्रिकेट क्लब, आयोजक स्पार्टन क्रिकेट क्लब, संडे क्रिकेट क्लब, टायटन्स् क्रिकेट क्लब, रायझिंग स्टार्स क्रिकेट क्लब, स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लब, स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब, ऑरेंज आर्मी क्रिकेट क्लब व ब्राईट इलेव्हन क्रिकेट क्लब या १४ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रूपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला १० हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. तिसर्या स्थानावरच्या संघाला करंकड देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन विहार ट्रॅव्हल्स्चे संचालक दिपक पुजारी यांच्या हस्ते शनिवारी होणार असून उद्घाटनाचा सामना या दोन संघांमध्ये होणार आहे.
