Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

आयसीआयसीआय बँकेतर्फे विद्यार्थी यंत्रणेसाठी ‘कॅम्पस पॉवर’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच

मुंबई – आयसीआयसीआय बँकेने भारत व परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. ‘कॅम्पस पॉवर’ असे नाव असलेल्या या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी, पालक व संस्था अशा विद्यार्थी यंत्रणेचे घटक असलेल्यांच्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. या प्लॅटफॉर्ममुळे एकाच छताखाली बँकिंग तसेच मूल्यवर्धित सेवा मिळणार असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागणार नाही. इतर बँकांच्या ग्राहकांसह सर्वांना ही सुविधा उपलब्ध आहे.

‘कॅम्पस पॉवर’ या अशाप्रकारच्या पहिल्या उपक्रमात युजर्सना त्यांच्या गरजेनुसार विविध आर्थिक उत्पादने घेण्यासाठी आवश्यक सहाय्य केले जाते. त्यामध्ये ओव्हरसीज अकाउंट, शैक्षणिक कर्ज आणि कर फायदे, परकीय चलन सुविधा, पेमेंट सुविधा, कार्ड्स, इतर कर्ज आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे. त्याशिवाय या प्लॅटफॉर्मद्वारे भारत तसेच कॅनडा, युके, जर्मनी, अमेरिका व ऑस्ट्रेलियायांसारख्या देशात उच्च शिक्षणाशी संबंधित विविध प्रकारच्या मूल्यवर्धित सेवाही पुरवल्या जातात. बँकेचे भागीदार अभ्यासक्रम/विद्यापीठ, ठिकाण, प्रवेश समुपदेशन, परीक्षेची तयारी, परदेशातील राहाण्याची सोय आणि प्रवासासाठी मदत अशाप्रकारच्या मूल्यवर्धित सेवा देतात.

या लाँचविषयी आयसीआयसाय बँकेच्या अनसिक्युअर्ड असेट विभागाचे प्रमुख श्री. सुदिप्ता रॉय म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही ग्राहकभिमुखतेवर भर देतो आणि बाजारपेठेच्या सातत्याने बदलत असलेल्या गरजांनुसार आमच्या सुविधांचा विकास करतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर असलेल्या गरजा समजून घेण्यासाठी आम्ही शिक्षण चक्राचा सखोल अभ्यास केला आहे. या संशोधनातून असे समोर आले आहे, की विद्यार्थी, त्यांचे पालक आणि संस्थांपुढे उच्च शिक्षणाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या घटकांशी संपर्क साधण्याचे आव्हान असते. यातून भारत व परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येवरून याचे महत्त्व लक्षात यावे. म्हणूनच आम्ही सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा एकाच छताखाली देण्यासाठी ‘कॅम्पस पॉवर’ हा प्लॅटफॉर्म लाँच केला.’

परदेशात फॉल सीझन आणि भारतात पुढचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी आम्ही ‘कॅम्पस पॉवर’ची सुरुवात करत आहोत. हा उपक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल, वैयक्तिक आणि सर्वसमावेशक सेवा पुरवून त्यांची मदत करणार आहे. विद्यार्थी आणि पालक आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असले किंवा नसले तरी त्यांना आमची उत्पादने व सेवांचा लाभ घेता येणार आहे. या लाँचसह आम्ही विद्यार्थी व पालकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समग्र अनुभव देण्याचे ध्येय ठेवले आहे.’ डिजिटल प्रयत्नांच्या जोडीला आयसीआयसीआय बँकेद्वारे विद्यार्थी यंत्रणेच्या मदतीसाठी शाखांची स्थापना केली जाणार आहे. पहिली शाखा आयआयटी कानपूर येथे सुरू होणार असून त्यानंतर देशभरातील आघाडीच्या संस्थांमध्ये सात शाखा सुरू केल्या जातील. या पूर्णपणे कार्यन्वित शाखांमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले, वैविध्यपूर्ण सेवा देणारे मनुष्यबळ कार्यरत असेल.

‘कॅम्पस पॉवर’तर्फे विद्यार्थी, पालक आणि संस्थांना विविध प्रकारच्या बँकिंग तसेच मूल्यवर्धित सेवा दिल्या जाणार आहेत.

  • बँकेतर्फे भारत आणि परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातील. या सेवांमध्ये शिक्षणासाठी निधी पुरवणे, अभ्यासक्रम आणि विद्यापीठ शोधण्यात मदत करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी सहाय्य करणे, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड उपलब्ध करणे व ओव्हरसीज स्टुडंट अकाउंट तयार करणे यांचा समावेश आहे.
  • आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रवासात मदत करण्यासाठी ‘कॅम्पस पॉवर’तर्फे पालकांना शैक्षणिक कर्ज घेण्यात तसेच पैसे हस्तांतरणात मदत केली जाते. त्याशिवाय त्यांना बचत खाते, गुंतवणूक उत्पादने, प्रवास आणि आरोग्य विमा घेण्यातही सहाय्य केले जाते.
  • संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना फंडिंग, पेमेंट्स, वसुली, गुंतवणूक आणि विमा अशा सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा एकाच छताखाली पूर्ण करण्यासाठी विविध उत्पादने व सेवा दिल्या जातात.

‘कॅम्पस पॉवर’तर्फे दिल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित सेवांसाठी बँकेने प्रतिष्ठित कंपन्यांशी करार केला आहे. त्यामध्ये आयडीपी एज्युकेशन (प्रवेशाशी संबंधित समुपदेशन, विद्यापीठ आणि ऑनलाइन परीक्षांच्या तयारीची माहिती), ब्रिटिश कौन्सिल (आयईएलटीएस तयारी आणि इंग्रजी भाषा सुधारण्यासाठीचे अभ्यासक्रम), कासिता (राहाण्याच्या सोयीसाठी) आणि ईझमायट्रिप (प्रवासाच्या आरक्षणसाठी) यांचा समावेश आहे. या सर्व सेवा ‘कॅम्पस पॉवर’वर उपलब्ध आहेत.

‘कॅम्पस पॉवर’चा अनुभव घेण्यासाठी व विविध उत्पादनांच्या माहितीसाठी भेट द्या: https://www.icicibank.com/campus-power

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading