लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरातर्फे वारक-यांना १२५ किलो बटाटा चिवडयाचा प्रसाद

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे च्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त आयोजन

पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त वारक-यांना १२५ किलो बटाटा चिवडयाचा प्रसाद देण्यात आला. पालख्या पुणे मुक्कामी असताना मोठया संख्येने वारक-यांनी मंदिरात दत्तमहाराजांचे दर्शन घेण्याकरिता गर्दी केली होती. त्यावेळी या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी बँक आॅफ बडोदा लक्ष्मी रस्ता शाखेचे मुख्य प्रबंधक प्रकाश बुक्तरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, विश्वस्त अमोल केदारी आदी उपस्थित होते. दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त राजू बलकवडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: