विद्यापीठातील सायन्स पार्क मध्ये बांबूपासून राखी बनविण्याची कार्यशाळा
इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स पार्क येथे २ जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी बांबूपासून पर्यावरणपूरक राखी बनविण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. ही कार्यशाळा सशुल्क असून यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत अधिक माहतीसाठी http://sciencepark.unipune.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.या कार्यशाळेच्या निमत्ताने रक्षबंधन पर्यावरणपूरक साजरा करण्याचाही संदेश देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात याविषयी कुतूहल निर्माण व्हावे यासाठी सायन्स पार्क कडून वर्षभर अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी शाळांना व वैयक्तिक नोंदणीही करता येते. याबाबतची अधिक माहिती संकेस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यशाळेच्या निमत्ताने रक्षबंधन पर्यावरणपूरक साजरा करण्याचाही संदेश देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात याविषयी कुतूहल निर्माण व्हावे यासाठी सायन्स पार्क कडून वर्षभर अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी शाळांना व वैयक्तिक नोंदणीही करता येते. याबाबतची अधिक माहिती संकेस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.