Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिका २०२२ च्या निवडणुकीसाठी तब्बल ८ लाख २३ हजार ९१६ मतदार वाढले

पुणे: आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून २०१७ च्या तुलनेत २०२२ च्या निवडणूकीसाठी तब्बल ८ लाख २३ हजार ९१६ मतदार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये धक्कादायक म्हणजे सर्वात जास्त मतदार प्रभाग क्रमांक ५४ यामध्ये १ लाख ३ हजार ९५९ मतदार आहेत, हा एक लाखापेक्षा जास्त मतदार असलेला एकमेव प्रभाग झाला आहे. त्यामुळे एकाच प्रभागात एवढे मतदार कसे वाढले याची उत्सुकता लागली आहे. तर प्रभाग क्रमांक २४ या मगरपट्टा- साधन विद्यालय या प्रभागात सर्वात कमी ३४ हजार ८० मतदार आहेत. ही मतदार संख्या प्रारूप यादीतील आहे, नागरिक, राजकीय पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यात बदल होणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाकडून ३१ मे २०२२ रोजी विधानसभेसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली. ही यादी महापालिका निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. ३४ लाख ५७ हजार ७१४ मतदारांसाठी सुमारे २९०० मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रभागाच्या हद्दीनुसार त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. या प्रारूप रचनेवर आक्षेप व सूचना करण्यासाठी १ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयासह सावरकर भवन येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही लेखी तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारींचा अभ्यास करून आवश्यक तेथे बदल केले जातील, असे आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.
प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय १० जणांचे पथक तयार केले आहे. हरकतींची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाईल. त्यात तथ्य असेल तर बदल केला जाईल, हे सर्व बदल ८ जुलै पर्यंत करून ९ जुलैला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे, असे उपायुक्त यशवंत माने यांनी सांगितले.


अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध – १३ मे २०२२

विधानसभा मतदारसंघ निहाय अंतिम नोंदणी – ३१ मे २०२२

महापालिकेसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध – २३ जून २०२२

हरकती व सूचना करण्यासाठी मुदत – २३ जून २०२२ ते १ जुलै २०२२

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध – ९ जुलै २०२२

याठिकाणी द्या हरकती व सूचना

लेखी स्वरूपात तक्रारी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बालगंधर्व रंगमंदिर शेजारील सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालयाच्या कार्यालयात हरकत नोंदविता येईल. आॅनलाइन हरकतीसाठी election@punecorporation.org यावर इमेल करता येईल

२०१७ आणि २०२२ ची मतदारांची तुलना

तपशील २०१७ २०२२

पुण्याची लोकसंख्या ३१,३२,१४३ ३५,५६,८२४

निवडून द्यायचे सदस्य १६२ १७३

महिला सदस्य ८१ ८७

एकूण मतदार (प्रारूप यादी) २६,३४, ७९८ ३४,५८,७१४

एकूण पुरुष मतदार १३,५७,९६६ १८,०७,६६३

एकूण महिला मतदार १२, ७६,७६५ १६,५०,८०७

एकूण इतर मतदार ६७ २४४

मतदान केंद्र ३४३१ ४३२४ (अंदाजे)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading