Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

हे श्री राम ! पक्षप्रमुख उद्धव साहेबांना बळ दे बंडखोरांना सुबुद्धी दे…!

शिवसैनिकांनी केली श्री रामाची महाआरती व होम हवन

पुणे: सन्माननिय उद्धव ठाकरे साहेबांना बळ मिळो आणि बंडखोरांना सुबुद्धी प्राप्त होवो यासाठी प्रभु श्री रामांची महाआरती करण्यात आली हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वाद व शिकवणीचे आम्ही सर्व शिवसैनिक, आमचे दैवत मा. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत काल, आज आणि उद्या ठामपणे आहोत. शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला समर्पित आहे. उद्धव साहेब आम्हा शिवसैनिक आणि जनतेच्या मनातील नेते आहेत. अशा भावना पुणे शिवसेना उपशहर प्रमुख आंनद गोयल यांनी व्यक्त केल्या.

राम मंदिर, गणेश विसर्जन घाट, चिमा गार्डन येरवडा पुणे ६ येथे शिवसैनिकांनी वतीने महाआरती व होम हवन केले. यावेळी उपशहरप्रमुख आनंद गोयल, शहर समन्वयक सुनील जाधव, उपशहर संघटक सागर माळकर, विधानसभा उपप्रमुख सचिन भगत, विभाग समन्वयक पाला मोरे, विधानसभा समन्वयक सचिन खांदवे, विभाग समन्वयक सतिश मुळीक, विभाग संघटक शंकर संगम, विभाग प्रमुख किशोर पाटील,विभाग प्रमुख शांताराम खलसे, विभाग प्रमुख शिवाजी वडगुले.विभागप्रमुख सोमनाथ खांदवे, संजय मोझे, उपविभाग प्रमुख संतोष गोविंद भोसले,संजय भालेराव, प्रभाग प्रमुख राजेश एरंडे, शशी देवकर, शाखाप्रमुख आदिल शेख ,मंगेश साळसकर,युवासेना मा.विभाग आधिकारी प्रशांत मोरे,अजय वाल्हेकर, गौरव शिंदे उमेश मोरे,बंटी दोरे, महिला आघाडीच्या उपशहर संघटिका कविताताई आंब्रे,स्मिता चव्हाण, सुक्ष्मीता जाधव, शिवसैनिक यशवंत मोरे,प्रमोद मोरे, आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading