Wednesday, October 28, 2026
Latest NewsPUNE

सीबीएसई विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात अभाविप चे विभागीय संचालकांना निवेदन

पुणे : दहावी आणि बारावी च्या एसएससी आणि एच एस सी बोर्डचे निकाल लागले आहेत. आणि, त्या निकालावर आधारित पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. मात्र, सीबीएसई बोर्डचे दहावी आणि बारावी चे अद्याप ही निकाल लागले नाहीत. यामुळे, संबंधित विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.

११वी तसेच प्रथम वर्षांच्या शिक्षणाचे साधारणतः बऱ्याच ठिकाणी प्रवेश प्रक्रिया चालू झाल्या आहेत. परंतु, सीबीएसई बोर्डचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल न लागल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. या सर्व परिस्थिती मुळे संबंधित विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ऑनलाईन ऑफलाईन च्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची याआधीच फटफजीती झाली आहे. त्यावर, निकाल न लागल्याने पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नसल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत. या पालकांचा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्यांना या प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी आपण विचार करावा. विद्यार्थ्यांना योग्य त्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास कोणतीही अडचण होणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी. अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र च्या वतीने उपविभागीय संचालक शेंडकर मॅडम यांना देण्यात आले. यावेळी, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply