उद्धव ठाकरे यांच्या सोबत आम्ही शेवट पर्यंत उभे राहू – जयंत पाटील 

मुंबई :  एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत’, असे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी ‘उद्धव ठाकरे यांच्या सोबत शेवट पर्यंत उभे राहू’, असे ट्विट केले आहे. त्यामुळे ‘माविआ’चे भवितव्य काय असणार याकडे सर्व मराठी माणसाचे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटंले आहे की, महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत शेवट पर्यंत उभे राहू. बाळासाहेबांच्या विचारांशी कोणताही सच्चा शिवसैनिक प्रतारणा करणार नाही, असा विश्वासही त्यांनी यामध्ये व्यक्त केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: