नारायण राणेंची शरद पवारांना धमकी


मुंबई : . “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.” अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली आहे. 

शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना  इथे यावंच लागेल राज्यपालांपुढे यावं लागेल. किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर आसाम किंवा गुजरातचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही, अशी कोपरखिळी पवारांनी लगावली होती. तर माध्यमातून काही गोष्ठी पुढे आल्या, ते नाकारता येत नाही. आमदार इथे आल्यानंतर ते ज्या पद्धतीने त्यांना नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती सांगतील. इथे आल्यावर आपण सेनेसोबत आहोत. हे सांगतील. बहुमत शिवसेनेसोबत आहे. हे सिद्ध होईल, असेही पवार म्हणाले होते. त्यावरच आता नारायणे राणे यांनी ट्विटचा भडीमार करत थेट पावारांनाच आता इशारा दिला आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: