शिवसेनेने केली ‘या’ 12 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी
मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताने न आल्याचं कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे.
मात्र ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर प्रत्येक आमदाराला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. या प्रकरणात आमदाराच्या वागणुकीकडेही लक्ष दिलं जाईल. सर्व पुरावे पाहिल्यानंतर अध्यक्ष यावर निर्णय घेतली, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
कुणाची आमदारकी रद्द करण्याची मागणी?
एकनाथ शिंदे (कोपरी)
तानाजी सावंत (भूम-परंडा)
संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर)
संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
अब्दुल सत्तार (सिल्लोड)
भरत गोगावले (महाड)
प्रकाश सुर्वे (मागाठाणे)
अनिल बाबर (सांगली)
बालाजी किनीकर (अंबरनाथ)
यामिनी जाधव (भायखळा)
लता सोनावणे (चोपडा)
महेश शिंदे (कोरेगाव)
यामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. तर संजय शिरसाठ यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमदारांची नाराजी व्यक्त केली होती. तर उर्वरित आमदार विविध प्रकरणात वादात आहेत. किंवा त्यांनी शिवसेनेत अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे 42 पैकी या ठराविक आमदारांचेच सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय.