Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

RealShivsainik हॅशटॅग वापरत ‘कोणाला घाबरवताय?’ एकनाथ शिंदे यांचे ट्विट

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  यांनी नुकतंच एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे सरकारला  उद्देशून आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. “कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत”, असंदेखील ते म्हणाले. “आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे”, असं शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading