डीईएसतर्फे वारकऱ्यांसाठी प्रथमोपचार केंद्र
श्रीमती सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम
पुणे : पंढरपुरला जाणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) श्रीमती सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने प्रथमोचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. वारकर्यांना पाणी, केळी, राजगिरा लाडू, बिस्कट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. उपप्राचार्या एन्जेला ब्रेव्हर, प्रा. शुभांगी माळवदे, वासुदेव माने, अमिश शिंदे यांनी संयोजन केले.