शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे आता पक्षाच्या विधिमंडळाचे नेते नाहीत.
ठाकरे सरकारमध्ये मंत्री शिंदे यांनी कठोर भूमिका घेत अन्य 21 आमदारांसह गुजरात गाठले आहे. ते सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये पक्षाच्या आमदारांसोबत राहत आहेत. पक्षाचे नेते त्यांच्याशी संपर्क करू शकत नाहीत. त्यांच्या या खेळीमुळे उद्धव सरकार अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे ट्विट करून म्हटलं की, आम्ही बाळासाहेबांचे खंबीर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्व शिकवले आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणुकीबाबत आम्ही कधीही फसवणूक केली नाही आणि सत्तेसाठी कधीही फसवणूक करणार नाही, असंह ट्विट शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे ते पुढं काय करणार याचा अंदाज लागणे कठीण झालं आहे.
भाजपवर निशाणा साधत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचा हा डाव आहे. शिवसेना हा निष्ठावंतांचा पक्ष आहे, आम्ही असे होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
