Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

’बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण…’ एकनाथ शिंदे यांचे ट्विट

मुंबई – मुंबई : शिवसेना वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठले आहे. दरम्यान, शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडणार का, अशी चर्चा सुरू झाली. यानंतर प्रस्ताव आल्यास सरकार स्थापन करु असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे.

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading