Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

शि.प्र. मंडळीच्या एसपीएम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत

पुणे :  स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचे अध्वर्यू आणि शिक्षण प्रसारक मंडळीेच्या स्थापनेमागील प्रणेते विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या वेशातील कलाकाराने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना लाडू भरवून आणि औक्षण करून मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांनी ज्ञानमंदिरात प्रवेश केला. काहींनी हसत हसत तर काहींनी रडत आपला शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय केला.

शि.प्र. मंडळीच्या लोकमान्य नगर येथील एसपीएम इंग्लिश स्कूलच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वागत  करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे सदस्य सुधीर काळकर, मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आणि शिक्षक उपस्थित होते. रांगोळीने सजविलेले प्रवेशद्वार आणि ढोल ताशांच्या आणि तूतारीचा निनादात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तुतारी व शंख वादनाची माहिती व प्रात्यक्षिक तसेच ढोल-ताशा चे स्थिर वादन हे माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.

रमा कुलकर्णी म्हणाल्या, तब्बल २  वर्षांनी शाळा सुरू झालेल्या आहेत. एसपीएम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळा पुन्हा गजबजल्या आहेत, त्यांना शाळेत बघून शिक्षकांना खूप आनंद झाला आहे. २ वर्षांच्या कालावधीनंतर शाळेत आल्यामुळे  शिकण्याच्या प्रक्रियेत थोडा विलंब होऊ शकतो. त्यामुळे विविध शैक्षणिक साहित्यासह विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक सज्ज आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading