बहुप्रतिक्षीत ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर रिलीज
अयान मुखर्जी यांच्या बहुप्रतिक्षीत ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ या चित्रपटाचा नेत्रदीपक ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत आहेत. यांसह महानायक अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय हे कलाकार दिसत आहेत.
सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मांडलेली आणि पूर्वी कधीही न पाहिलेली नेत्रदीपक दृश्ये या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. आधुनिक जगात कल्पनारम्य, साहस, वाईटावर चांगल्याचा विजय, प्रेम या संकल्पनेवर हा चित्रपट असल्याचे दिसत आहे.
जवळपास आठ वर्षांपूर्वी 2014 मध्ये पहिल्यांदा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. परंतु अनेक अडथळ्यांमुळे हा चित्रपट लांबला होता. दिग्दर्शक करण जोहर, अपूर्व मेहता, नमित मल्होत्रा आणि मुखर्जी यांनी धर्मा प्रॉडक्शन, प्राइम फोकस आणि स्टारलाईट पिक्चर्स या बॅनरखाली स्टार स्टुडिओच्या सहकार्याने याची निर्मिती केली आहे.
