Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

फर्ग्युसन कॉलेज मैदान परिसरातील अनेक जुने वृक्ष उन्मळून पडण्याची शक्यता:आप ची तक्रार

पुणे: फर्ग्युसन कॉलेज या ऐतिहासिक वास्तू परिसरात खेळाच्या मैदानालगत अनेक वर्षांची जुनी वट व इतर देशी झाडे आहेत. त्याच्या सावलीत खेळाडू विश्रांती घेतात , जेष्ठ नागरिक व्यायाम करतात. हे मोठे वृक्ष ही महत्वाची जतन करण्याची बाब आहे. परंतु या वृक्षाच्या अत्यंत जवळ पाईप लाईन साठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वृक्षाचे एक बाजूचे मुळांचे जाळे हे कापण्यात आलेले आहे. आता वृक्षाचा डोलार्याचा भार आणि व्यास मोठा असल्याने ही झाडे वादळी वार्यात सहज उन्मळून पाडतील ही बाब काल आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सनी मुरुडकर यांना ही बाब निदर्शनास आली. सनी मुरुडकर आणि सतीश यादव या कार्यकर्त्यांनी त्याचे अवलोकन करीत फोटो घेतले आहेत व वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायद्यानुसार शहरातील वृक्षांची तोड नियंत्रित करणे ही प्राधिकरणाची जबाबदारी आहे. सदरचे खोदकाम हे या सर्व वृक्षासाठी अत्यंत धोकादायक झाले आहे. त्याची मुळे कापली गेल्याने असमतोल तयार होऊन ती उन्मळून पडू शकतात तसेच मुळांची तोड झाल्याने मरू शकतात. सदरची बाब ही गुन्हा असल्याने सर्व संबंधितावर कारवाई होणे गरजेचे आहे असे आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

हे खोदकाम करणारे , त्या कामची आखणी करणारे सरकारी / बिगर सरकारी अधिकारी या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम् आदमी पार्टीने केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading