महागाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदी महागाई बाजार
पुणे : आजपर्यंत अनेक बाजारपेठ पुणे शहरात सुरू झाले असून आठवडे बाजार,शेतकरी बाजार,पण आज पुण्यातील जंगली महाराज रोड वर उभारण्यात आलेल्या मासळी बाजार सह मोदी महागाई बाजार पेठची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जंगली महाराज रोड वर उभारण्यात आलेल्या मोदी महागाई बाजार पेठेत पुस्तक विक्री केंद्रापासून ते मासळी बाजार पेठ पर्यंत बाजारपेठ उभी करून महागाई विरोधात आगळ वेगळा आंदोलन करण्यात आल आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूत देखील मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे.या वाढीच्या निषेधार्थ आज आम्ही मोदी बाजार पेठ उभी केली असून मोदी सरकारचा या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहे.अस यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सीमा सातपुते, रुपाली पाटील ठोंबरे, मृणाल वाणी, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, या मोदी सरकारने एवढी महागाई वाढली आहे की आम्हालाही आंदोलन करू नका लाज वाटत आहे. त्यामुळे आज आम्ही मोदी महागाई बाजार पेठे उभी करून नागरिकांना स्वस्त दारात मासे चिकन व फळे भाज्या उपलब्ध करून देत आहोत.आता मोदी सरकारने आता तरी महागाई कमी करावी अशी आम्ही या आंदोलनातून विनंती करत आहोत .असे प्रशांत जगताप म्हणाले.
