यंदा पितृदिनानिमित्त एण्ड टीव्ही प्रशंसित करत आहे वडिल-मुलांच्या नात्याला
यंदा पितृदिनानिमित्त एण्ड टीव्ही त्यांच्या मालिकांमध्ये विशेष एपिसोड्स सादर करणार आहे, ज्यामध्ये वडिल व त्यांच्या मुलांमधील सुरेख नाते पाहायला मिळेल. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘बाल शिव’मधील फादर्स डे एपिसोडबाबत ऋषी कट्यायन म्हणाले, ”सुरू असलेल्या एपिसोडमध्ये ऋषी कट्यायन (मनोज कोल्हटकर) आणि त्याची मुलगी देवी कट्यायनी (त्रिशा आशिष सरदा) यांच्यामधील नात्याला सुरेखरित्या दाखवण्यात आले आहे. बाल शिव (आन तिवारी) देवी पार्वतीचा (शिव्या पठानिया) शोध घेत आहे, जेथे तिने ऋषी कट्यायनची मुलगी देवी कट्यायनी म्हणून जन्म घेतला आहे. कट्यायनी जखमी होऊन बेशुद्ध पडते आणि कट्यायन मदतीसाठी ओरडू लागतो. पण देवी कट्यायनीला डोंगरावर सापडलेला रूद्राक्ष कट्यायनच्या हातामधून तिच्या डोक्यावर पडतो आणि ती बरी होते. त्याचवेळी ऋषी दादीची ऋषी कट्यायनला समजावण्याचा प्रयत्न करतो की, त्याने देवी कट्यायनी व बाल शिवची भेट केली पाहिजे. पण त्याला ते मान्य होईल का?”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘और भई क्या चल रहा है?’मधील फादर्स डे एपिसोडबाबत जफर अली मिर्झा म्हणाले, ”किशोरवयीन आदि (अक्षय लांबा) व इनाम (दिव्यांश मिश्रा) संपूर्ण कुटुंबाला थकित करणा-या गोष्टी करत राहतात. त्यांच्या बॅगेमध्ये मॉडेल मॅगझीन्स सापडतात, ते मुलींच्या शाळांना भेट देतात आणि शायरी पुस्तक वाचतात, ज्याबाबत सकिना (आकांशा शर्मा) व शांती (फरहाना फतेमा) गैरसमज करतात. दोघी मिर्झा (पवन सिंग) व मिश्रा (अंबरिश बॉबी) यांच्याकडे चिंता व्यक्त करतात. बिट्टू (अन्नू अवस्थी) त्यांना कठोर वडिल बनण्याऐवजी मुलांचे उत्तम मित्र बनण्याचा सल्ला देतो, जो त्यांना त्यांच्या किशोरवयीन काळात मार्गदर्शन करू शकतो. हा वडिल व मुलांच्या नात्यावर लक्षवेधक व रोमांचक एपिसोड आहे.”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील फादर्स डे एपिसोडबाबत विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ”विभुती (आसिफ शेख) व चाचाजी (अनुप उपाध्यय) मद्यपान करताना उत्तम वेळ व्यतित करत असतात, तेव्हाच विभुती भावूक होतो आणि चाचाजींना फादर्स डेच्या आनंदमय शुभेच्छा देतो. तसेच त्यांना सांगतो की, तो नेहमीच त्यांच्यामध्ये स्वत:च्या वडिलांना पाहत आला आहे. तो वडिल सर्वकाही त्याग करून हिमालयामध्ये निघून गेल्यानंतर वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला मोठे करण्यासाठी आणि त्याची आई हेलनची (प्रतिमा कानन) काळजी घेण्यासाठी चाचाजींचे आभार देखील मानतो. दुसरीकडे चाचाजींच्या या स्थितीप्रती प्रतिक्रिया प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करतील.” एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील फादर्स डे एपिसोडबाबत दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ”हप्पू (योगेश त्रिपाठी) कुटुंबाकडून सतत होत असलेला अपमान व लज्जास्पद वागणूकीला वैतागला आहे. ऋतिक (आर्यन प्रजापती), रणबीर (सोम्या आझाद), चमची (झारा वारसी), काटे (आश्ना किशोर) आणि मलायका (जस्नीत कौर कांत) हे त्याच्या व बेनीच्या (विश्वनाथ चॅटर्जी) डोळ्यांवर पट्टी बांधतात. हप्पू चिंतित होतो, कारण त्याला वाटते की त्याची मुले पुन्हा काहीतरी वाईट योजना आखत आहेत. पण त्याला सरप्राईज मिळते, तो फादर्स डेच्या आनंदमय शुभेच्छा देणारा बॅनर आणि त्याच्यासाठी व्यवस्था केलेला केक पाहतो. त्यानंतर फादर्स डे सेलिब्रेशन कसे होते? हे पाहणे रोचक असणार आहे.”
