Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

वटपौर्णिमेनिमित्त अहिल्यादेवी हायस्कूल मध्ये पर्यावरण रक्षण प्रतिज्ञा

वटपौर्णिमेनिमित्त अहिल्यादेवी हायस्कूल मधील शिक्षिकांची पर्यावरण रक्षण व मूल्य संवर्धन विषयक प्रतिज्ञा
मंगळवार दिं14 जून 2022 रोजी अहिल्यादेवी हायस्कूलमधील शिक्षिकांनी शाळेसमोरील वटवृक्षाला भेट देऊन एक अनोखी प्रतिज्ञा घेतली. पर्यावरण रक्षण, कुटुंबाचे संगोपन, नात्यांची जपणूक, सावित्रीचा वसा, मूल्यांची शिदोरी हीच आमची जबाबदारी, अशी प्रतिज्ञा घेऊन वृक्ष, पर्यावरण आणि राष्ट्राप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला मा. मुख्या. अनघा डांगे, मा. पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई व पर्यवेक्षिका मा. स्मिता राजगुरु यांच्यासह सर्व शिक्षिका व शिक्षकेतर उपस्थित होते. प्रशालेच्या पर्यावरण विभागातर्फे हा उपक्रम घेण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading