Wednesday, June 3, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

श्रद्धा कपूरचा भाऊ अभिनेता सिद्धांत ड्रग्ज प्रकरणात बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात

बंगळुरू : अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ अभिनेता  सिद्धांत याला ड्रग्ज घेतल्याचा आरोपावरुन बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

बंगळुरूमधील एमजी रोडवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकताना पोलिसांनी कारवाई केली. यात सिद्धांतसह आणखी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सिद्धांत सध्या उलसूर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे बंगळुरू शहर पूर्व विभागाचे डीसीपी डॉ भीमाशंकर एस गुलेद यांनी सांगितले.

पोलिसांनी अमली पदार्थाच्या सेवनाचा संशय असलेल्या लोकांचे नमुने तपासासाठी पाठवले होते. त्यात तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या सहा जणांमध्ये सिद्धांतच्या नमुन्याचाही समावेश होता. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणी केलेल्या चौकशीत श्रद्धा कपूरचाही समावेश होता. या प्रकरणात श्रद्धाच्या विरोधात ठोस पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत.

दरम्यान, सिद्धांत कपूर याने 1997 मध्ये जुडवा या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. अग्ली, जज्बा, हसीना पारकर, पलटन, हॅलो चार्ली आणि चेहरे यांसारख्या चित्रपटांमध्ये सिद्धांतने काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भौकाल या मालिकेतही सिद्धांत दिसला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading