पुणे पोलिसांनी त्यांची ओळख पटवल्यानंतर शोधाला गती दिली-कुलवत कुमार सारंगल
पुणे:पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आलं. वर्षभरापासून मागावर असलेल्या पोलिसांनी संतोष जाधवला गुजरातमधील भूज जिल्ह्यातून अटक केली. सतोष जाधवला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून.अप्पर पोलीस महासंचालक कुलवत कुमार सारंगल यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अटकेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
मुसेवालाच्या हत्येचा तपास करत असताना इतर जणांबरोबर पुण्यातील सौरभ ऊर्फ महाकाल आणि संतोष जाधव यांच्यावर पोलिसांना संशय आला. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांची ओळख पटवल्यानंतर शोधाला गती दिली. अशि माहिती पत्रकार परिषदेत दिली.
कुमार सारंगल म्हणाले,महत्त्वाचं म्हणजे संतोष जाधव गेल्या वर्षभरापासून फरार होता. ओंकार ऊर्फ राण्या बानखेले खून प्रकरणात त्यांच्याविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (गु. रजि. नं. ४५९/२०२१, भा.दं.वि. कलम ३०२, १२०(ब) ३४ शस्त्र अधिनियम कलम ३, २५. २७. सह मोक्का कलम ३(१)(ii), ३(४)) दाखल आहे.संतोषसुनील जाधव याने त्याच्या साथीदारांसह ओंकार ऊर्फ राण्या आण्णासाहेब बाणखेले याचा गोळ्या घालून खून केला होता. संतोष जाधव हा विविध राज्यात सतत फिरत असल्यामुळे त्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, ७ जून २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संतोष जाधवला आश्रय देणाऱ्या सौरभ ऊर्फ सिद्धेश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे यास अटक केली. अशी माहिती कुमार सारंगल यांनी दिली.
संतोष जाधववर पोलीस स्टेशन मध्ये असलेले गुन्हे
१) मंचर पोस्ट रजि.नं. ११८/२०१७, भादवि कलम ३०७,१२० (ब), २०९,३४, २) मंचर पो.स्टे.जि.नं. ४६३/२०२९, भादवि कलम १२०(ब), शस्त्र अधिनियम कलम ३.२५, जुवेनाईल जस्टीस अॅक्ट कलम ८३(२), ३) मंचर पो.स्टे गु. रजि. नं. १४०/२०१९, भा.दं.वि कलम ३६३ ३७६, पॉक्सो अॅक्ट फल ४,६,८.९२, ४) मंचर पो स्टे राज. नं. ४५९/२०२१, भा.दं.वि. कलम ३०२,१२० (ब). ३४ शस्त्र अधिनियम कलम ३,२५,२७, ५) मंचर पो.स्टे. गुरजि नं १०७/२०२२, भादंवि कलम ३८४,३८५,५०६, ३४ असे गुन्हे दाखल आहेत.
