Wednesday, June 17, 2026
Latest NewsNATIONALPUNETOP NEWS

Pune : नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई, भंगार व्यावसायिकाडून 1105 काडतुसे जप्त

पुणे : कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका भंगाराच्या दुकानातून तब्बल 1105 काडतुसे जप्त केली आहेत. तसेच दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (34, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत, पुणे. मुळ रा. मंगलपूर, उत्तरप्रदेश) या भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट एकने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जूनला देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने पुणे शहर आणि परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या ऑपरेशनदरम्यान, पोलिसांनी गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकली. या धाडीत पुणे पोलिसांना 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे आणि 970 बुलेट लीड अशी एकूण 1105 काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ही काडतुसे जप्त करत भंगार व्यावसायिक सरोज याला अटक केली. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत 1 लाख 65 हजार 900 रुपये आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या भंगारव्यावसायिकाने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात काडतुसे कुठून आली, ती कशासाठी आणली आणि तो ही कोणाला देणार होता, याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading