Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

काय बरोबर आणि काय चुकले याचे आत्मपरिक्षण आवश्यक – सुप्रिया सुळें

पुणे:राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यामध्ये भाजपाचे दोन, शिवसेनेचे एक, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी उमेदवाराने विजय मिळवला. सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिले होते. भाजपाचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिघेही निवडून आले असून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हेही निवडून आले आहे. शिवसेनेला मात्र धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले असून संजय राऊतांना अगदी निसटता विजय मिळाला आहे.त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. काय बरोबर आणि काय चुकले याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पुण्यात पत्रकाराशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,जर तुम्ही संख्यांवर नजर टाकली तर स्पष्टपणे आमच्याकडे शेवटपर्यंत योग्य संख्या नव्हती. पण आम्ही एक संधी घेतली. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.भाजपाने हा रडीचा डाव खेळला. असा आरोप महाविकास आघाडी मधील नेते करत आहेत. त्यावर शरद पवार यावर सगळे बोललेच आहेत. आम्ही ड्रामा करत नाहीत तर खूप सिरियस काम करतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपाने हा रडीचा डाव खेळला. शरद पवार यावर सगळे बोललेच आहेत. आम्ही ड्रामा करत नाहीत तर खूप सिरियस काम करतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या,
राज्यसभा निवडणुकीतील या पराभवानंतर आता महाविकास आघाडी एक-दोन दिवसात बैठक घेईल. त्यानंतर स्पष्ट होईल, कुठे काय कमी पडेल. आम्ही रोज रिस्क घेतो. ज्या घरात माझा जन्म झाला तिथे मी जेवढे यश बघितले तेवढेच अपयशही बघितले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
निवडून आयोगाकडून जे झाले तो बालिशपणा वाटतो. दबाब सगळ्यांवरच आहे. मात्र भाजपातर्फे रडीचा डाव खेळण्यात आला. नबाब मलिक आणि अनिल देशमुख दोषी नसतात त्यांना डांबून ठेवले, असा आरोप त्यांनी केला. तर शेवटी राज्यसभेत विजयी झालेल्या भाजपाचे अभिनंदनही सुप्रिया सुळे यांनी केले. प्रत्येक निवडणूक जिंकता येत नाही. त्यामुळे आम्ही आमचा पराभव स्वीकार करतो. काय चुकले, काय बरोबर याचा विचार केला जाईल. आम्ही कुठे कमी पडलो, याचे चिंतन करू, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading