fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देवेंद्र अकेला नहीं है, सारी कायनात उनके साथ आहे – अमृता फडणविस

पुणे : राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिले होते. भाजपाचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिघेही निवडून आले असून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हेही निवडून आले आहे. शिवसेनेला मात्र धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले असून संजय राऊतांना अगदी निसटता विजय मिळाला आहे. हा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला आहे .असे भाजपचे नेते सांगत आहेत. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देते.याचा आनंद आहे. हा सत्याचा विजय आहे.भाजप चा कर्तृत्वावर हा निकाल आहे.भाजपकडे लोक जे आले ते प्रेमाने आलेत.सत्याच्या बाजूनं सर्व जण आहेत.देवेंद्र एकेला नहीं है, सारी कायनात उनके साथ आहे अशि प्रतिक्रिया पुण्यात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणविस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली.

अमृता फडणविस म्हणाल्या,आपला राजा आहे आत्ता जो आहे तो आपल्या प्रजेसाठी किती ठीक आहे हे मी विचारत होते, त्यावेळी कोणी बोलत नव्हतं. आता सगळ्यांना कळल आहे.राजा कसा आहे, त्यामुळं मला आता काही बोलायची गरज नाही. अशी टीकाही अमृता फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर केली.
महा विकासआघाडी मधील मंत्री भाजपने रडीचा डाव खेळला असा आरोप करत आहेत .त्यावर भाजप काही महाविकास आघाडी नाही रडीचा डाव खेळायला अशी टीका अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी वर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading