Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

रघुनाथ कुचीक लवकरच गजाआड जातील – चित्रा वाघ

पुणे : 2 -3 महिन्यापूर्वी एका पीडित तरुणी मुलीने शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी माझ्यावर बलात्कार केला असा आरोप केला. त्यामुळे पुण्यात राजकारण खूप तापले. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला येऊन रघुनाथ कुचिक यांचे पद रद्द करावे व जामीन अर्ज रद्द करावा अशी मागणी केली होती त्यावर शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी बनावट पुरावे सादर केले त्यामुळे त्यांचा जामीन लवकरच रद्द करण्यासाठी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच रघुनाथ कुचीक हे गजाआड जातील. असा दावा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुण्यातील पत्रकार परिषद  केला. 

या पत्रकार परिषदेला भाजपाचे सरचिटणीस राजेश पांडे, भाजपचे पुणे प्रदेश प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर, धनंजय जाधव उपस्थित होते.
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्तांवर देखील ताशेरे ओढले आहेत. विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार खोट्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्तांनी एक बेकायदेशीर परिपत्रक काढल्याचा दावा देखील चित्रा वाघ यांनी केलाय. मुंबई पोलीस आयुक्तांकडे तसा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना देखील मुंबईचे पोलीस आयुक्तांनी जो परिपत्रक काढला त्यामुळे विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार गुन्ह्यातील खऱ्या पीडितांना मोठा फटका बसेल. असा दावा देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.
विधान परिषदेवर इतर कोणत्याही पक्षाने महिला उमेदवाराला संधी दिली नाही. त्यामुळे मला विधानपरिषद उमेदवारी मिळाली नाही याची मला खंत नाही आहे. उलट माझ्या पक्षाने एका महिलेला उमेदवाराला उमेदवारी दिली, त्यामुळे विधानपरिषद आमची एक महिला आमदार वाढत असल्याचा मला आनंद आहे. असं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading